Thursday, 25 December 2025

ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम

 ग्रामतालुकाजिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी

कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम

 

ग्रामतालुका व जिल्हा स्तरावर विकासाभिमुख कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम २.० व राज्यातील सरपंचांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे दोन्ही कार्यक्रम मित्रा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतील.

जिल्हा कर्मयोगी २.० कार्यक्रम गावतालुका व जिल्हा अशा स्तरांवर राबविण्यात येईल. यात सेवा देणाऱ्या थेट संबंधित अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक प्रशासनातील शेवटच्या टप्प्यातील अधिकारीकर्मचारी यांचे कौशल्य वाढविण्यात येणार आहे. यातून जिल्ह्याचा जीडीपी वाढविण्याकरिता सुक्ष्मलघु व मध्यम उद्योग औद्योगिक युनिट्सतसेच शेतकरी उत्पादक संघटना -एफपीओज् यांसारख्या कृषी - संबंधित आर्थिक घटकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हा स्तरावर शासन-ते-व्यवसाय सेवा सुधारणेवर भर दिला जाईल. विविध विभागांमधील सहकार्य वाढवून डेटा संकलनसमन्वय आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल. थेट लोकांमध्ये जाऊन काम करणारे अधिकारी कृषी अधिकारीकनिष्ठ अभियंता व कार्यकारी अभियंताग्रामसेवकतलाठीकृषी सहाय्यकबहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसिंचन कालवा निरीक्षकजिल्हा व सहाय्यक सांख्यिकी अधिकारी तसेच सांख्यिकी निरीक्षक व अन्वेषक इत्यादींचे सक्षमीकरण केले जाईल. राज्यातील सुमारे ८५ हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

सरपंच संवाद कार्यक्रमासाठी भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआयमित्रा आणि व्हीएसटीफ फाऊंडेशन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २० हजार सरपंचांना प्रशिक्षण दिले जाणे अपेक्षित आहे.

या प्रशिक्षणात प्रामुख्याने आर्थिक स्वायत्तता व संसाधनशासन योजना राबविणेग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठीचे दूरगामी नियोजनमहिला सदस्यांचे सक्षमीकरणअंमलबजावणीतील त्रुटी शोधणे व त्यावर मात करणेतसेच विविध गटांसाठी समावेशक व सुसंगत प्रशिक्षणाचा समावेश असेल. तज्ज्ञांद्वारे तसेच ई-लर्निंगवेबिनारइन-अॅप प्रशिक्षणआभासी सत्रे आणि कार्यशाळा या माध्यमांतून हे प्रशिक्षण दिले जाईल.

-००-

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi