Saturday, 20 December 2025

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी

शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १९ : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज)इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीगुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर रविकिरण पाटील यांनी केले आहे.

 

या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://prematric.mahait.org/Login/Login लॉगिनद्वारे शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्ज नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी Pre_SE27XXXXXXXXX_Principal हा युजर आयडी व Pass@123 हा पासवर्ड वापरून लॉगिन करावे. त्यानंतर शाळेचे प्रोफाइलमुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

 

विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेतत्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभजइमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे. एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावीअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi