Saturday, 20 December 2025

थोर आधुनिक संत गाडगे महाराज यांची तुलना होणे अशक्यच

 तळमळीचे,समाज सुधारक

दिनदलित,गोरगरीब उद्धारक

अस्पृश्यता,जातीभेद उच्चाटक

अस्वच्छता,अंधश्रद्धा,अज्ञान निर्मूलक

विज्ञान,सुधारणेचा अंगीकारक

कीर्तनकार प्रबोधनात्मक 

ऐसा जगावेगळा ,अवलिया

आधुनिक संत गाडगे महाराज !

 विनम्र अभिवादन🙏💐

       **************

   आज हस्तीदंती मनोऱ्यात सुख वैभवात राहाणारे, पैशात लोळणारे, अलिशान गाड्यामधून फिरणारे, केवळ शब्द पांडित्यावर जनतेला भुलविणारे, डोलविणारे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे ,आपत्कालीन स्थितीत आपद्ग्रस्ताना प्रत्यक्षात तेथे जाउन त्यांना धीर न देणारे,त्यांचे अश्रू न पुसणारे, कोणतीही मदत न करणारे,त्यांना अंधश्रद्धेच्या नादी लावणारे  असे तथाकथित आध्यात्मिक बाबा,बुवा,महाराज यांची व  समाजसुधारणेसाठी,अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ,स्वच्छतेसाठी तसेच बहुजन, मागासलेला वर्ग शिक्षण घेऊन साक्षर,शिक्षित व ज्ञानसंपन्न व्हावा,अस्पृश्यता, जातीभेद नष्ट व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्य त्यासाठी  व्यतीत करणारे असे खरेखुरे ध्येयवादी कृतीशील,निस्वार्थी,निरपेक्ष समाजसुधारक, समाज प्रबोधक व साध्या राहाणीचा अंगीकार करणारे असे थोर आधुनिक संत गाडगे महाराज यांची तुलना होणे अशक्यच! आज संत गाडगे बाबा यांना


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi