Monday, 1 December 2025

टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमीराजगृहडॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालयवडाळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपरळमधील बीआयटी चाळसिद्धार्थ महाविद्यालयफोर्ट या स्थळांचा समावेश आहे.  या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवाससामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

            टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवाससहल मार्गदर्शकअल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन संचालनालयाने या सर्किटचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी हे टूर सर्किट महत्त्वपूर्ण ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  3 डिसेंबर 2025रोजी सकाळी  9.30 वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिरशिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमीदादरमुंबई येथून सकाळी 9.30 वाजता होऊन  सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

000

*सहलीसाठी संपर्क :* 

सूरज चतुर्वेदी - ८१०८१७५५३०

पवन पवार – ७६६६६०३२११                                

पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi