Saturday, 29 November 2025

स्व - संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर

 स्व - संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर

-         जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने वीरांगना प्रशिक्षण सुरू

 

धुळेदि. २८ : विद्यार्थिनींना संकट समयी स्वत:चे संरक्षण करता यावे म्हणून प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने वीरांगना प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून विद्यार्थिनी स्व संरक्षणात आत्मनिर्भर होतीलअसा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय वीरांगना प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाजमहानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीसपोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेश्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरेअपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकरजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळेआदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरेअधीक्षक अभियंता अनिल पवारकार्यकारी अभियंता आर. आर. पाटीलशिक्षणाधिकारी मनीष पवार (माध्यमिक)किरण कुवर (प्राथमिक)जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi