Saturday, 29 November 2025

विद्यार्थिनींमध्ये ज्ञान, आत्मभान आणि सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जिल्हा

 जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या कीविद्यार्थिनींमध्ये ज्ञानआत्मभान आणि सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी चांगला समन्वय ठेवला आहे. या प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील सर्व माध्यमातील विद्यार्थिनी सहभागी होत आहेत. या उपक्रमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थिनींना पुढील आयुष्यात होऊन त्या स्व- संरक्षणासाठी सिद्ध होतीलअसा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी व्यक्त केला.

शिफूजी यांनी विद्यार्थिनींनी स्व संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या उपक्रमातून स्व संरक्षणासाठी प्रशिक्षण मिळणार आहेअशा प्रतिक्रिया विविध विद्यालयातून आलेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

शिक्षण विस्तार अधिकारी रंजना धिवरेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारीविविध विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थिनींना स्व - संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi