Wednesday, 19 November 2025

सर्व विद्यापीठांनी डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्व विद्यापीठांनी डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यानुसार प्रत्येक विद्यापीठासाठी किमान दोन सदस्यांची स्वतंत्र पथक नियुक्त केले जाणार आहे. हे पथक विद्यापीठांना मार्गदर्शन करणार असूनप्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन माहिती तपासेल. यामुळे डॅशबोर्डवरील आकडेवारी निर्दोष व अचूक राहील. विद्यापीठांनी त्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा. दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक होईल. त्यातून उत्तम परिणाम साधता येतील. तसेच वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व विद्यापीठांनी विशेष सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावेअसेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi