Wednesday, 19 November 2025

विकसित महाराष्ट्र 2047 - उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती -

 विकसित महाराष्ट्र 2047 - उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती

-         उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

विद्यापीठांना डॅशबोर्ड ३० नोव्हेंबरपूर्वी परिपूर्ण करण्याचे आदेश

 

मुंबई दि. 17 : महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीतअसे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रियाशैक्षणिक गुणवत्ताप्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील 15 दिवसांत पूर्णपणे करावा, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.

विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047 व उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन : विद्यापीठांची भूमिका व योगदान या विषयी मुंबई विद्यापीठ येथे परिषद झाली. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरकला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळेउपसचिव प्रताप लुबाळसहसचिव संतोष खोरगडे आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरूप्र-कुलगुरू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi