Monday, 20 October 2025

महाराष्ट्रातील वाद्ये या विषयावरील "वाद्यमंथन" या ई-पुस्तकांचे

 महाराष्ट्रातील वाद्ये या विषयावरील "वाद्यमंथनया -पुस्तकांचे

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडआशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन

 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे लिखित

"वाद्यमंथनपुस्तकात महाराष्ट्रातील ११० वाद्यांची सचित्र माहिती

 

मुंबई १८ : ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्य’ या विषयावर आधारित वाद्य मंथन’ या ११० वाद्यांचा परामर्श घेणाऱ्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडआशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. "वाद्यमंथनया पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वाद्यांची जनतेस वेगळी ओळख होईलअसे प्रतिपादन यावेळेस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडआशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील ७५ वाद्यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण कार्यक्रम पु  देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला होताया कार्यक्रमादरम्यान विभीषण चवरे लिखित "वाद्यमंथनया  -पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. "वाद्य मंथनया  पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील ११० वाद्यांची सचित्र ओळख आहेवाद्य कोणत्या प्रकारातील आहेकधी वाजवले जातेयाची रचना कशी आहेयाचा सांस्कृतिक उपयोग कसा आहेयाचाही ऊहापोह यात  करण्यात आलेला आहेयामध्ये अनेक लोक वाद्यांचा समावेश आहे.  त्या लोकवाद्यांमध्ये टिमकीटिंगरीडेराहिरोबाई किंगरीडकलवार किंगरीबिगुलभेरकिल्लेतोंडातारपापागईघाटोळीघांगळीचोंगामंदलमंदारीपिरीढाकडहाकासुरसोटागादलीशिंग पेपातुरंबाधुम्मसडवरपावरीदिमडीगुडगुडीघुमटकरतालटप्पाचिटकुरीघाटीखैताळरेलाटिंगरीतिबुलीडोनाघोळकाठीतटकलीमादळगुबूगुबू ढोलखालुबाजाकहाळेतुंबडी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा समावेश आहेसंबळसनईचौघडासुंदरीवेगवेगळ्या प्रकारचे ढोलभोंगापिपाणीपायपेटीपखावजहलगी ताशाचोंडकेढिंगीसारंगीतुणतुनेतुर अशाही वाद्यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्राची कला  संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून यातील अनेक घटक हे नव्याने प्रेक्षकांसमोर यायला हवेतअसे प्रतिपादन ॲडआशिष शेलार यांनी यावेळेस केले. "वाद्य मंथनया -पुस्तकाचा उपयोग विद्यार्थीअभ्यासककलाकार  रसिकांना नक्कीच होईल असा विश्वासही त्यांनी या वेळेस व्यक्त केलायापुढेही महाराष्ट्राच्या दुर्मिळ संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्यात येईल असेही ॲडआशिष शेलार यांनी प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi