Sunday, 14 September 2025

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार

 महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये

सहकार्याची नवी दारे खुली होणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार

·         शेतीअन्नप्रक्रियाआरोग्यपर्यटनक्रीडाअक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल

·         विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार

 

मुंबईदि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषीजैवतंत्रज्ञानवित्तीय सेवापायाभूत सुविधानवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले.

सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना

अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेतीकृषितंत्रज्ञानडिजिटायझेशनआरोग्यव्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासपर्यटनक्रीडाजैवतंत्रज्ञानसामाजिक-आर्थिक सेवानवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार  असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमारउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेनानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंगमुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेतसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैगविकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi