बांबू उद्योगाचे राष्ट्रीय उत्पादनात मोठे योगदान
जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. १८ : जागतिक बांबू दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशन, लोदगा (लातूर) आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या घोषवाक्याखाली एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागाने विविध सत्रे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात बांबूच्या उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. "बांबू आधारित उद्योग" या सत्रात उद्योजक नीरज मुथा, प्राध्यापक पराग नेमाडे, प्रोफेसर निर्मला आणि बांबू पेटंटधारक गणेश वर्मा यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment