Friday, 19 September 2025

बांबूपासून सेल्युलोज आणि लिग्नीन मोठ्या प्रमाणात तयार करता येते. बांबूचा उपयोग रसायन उद्योगात मोठ्या

 भारत हा बांबूचे सर्वात मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. बांबूपासून सेल्युलोज आणि लिग्नीन मोठ्या प्रमाणात तयार करता येते. बांबूचा उपयोग रसायन उद्योगात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत पराग नेमाडे यांनी व्यक्त केले.

ऋग्वेदामध्ये बांबूला कल्पवृक्ष म्हटले असल्याचे प्रोफेसर निर्मला यांनी सांगितले. बांबू हे बहुआयामी उत्पादन आहे. बांबूचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात असून बांबू हे सुपर फूड आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथे झालेल्या प्रदर्शनात नीरज मुथा यांच्या कारखान्यात तयार झालेले बांबू उत्पादन पाहिले. त्यानंतर श्री.मुथा यांचे बांबूपासून तयार झालेले फर्निचर नवीन संसदेत वापरण्यात आले आहे. मुंबई येथील राजभवन येथेही बांबू निर्मित उत्पादन वापरण्यात येत आहे. बांबूचा उपयोग फर्निचरभिंती सजावटदरवाजेखिडक्याफ्रेम आदींमध्ये करण्यात येत आहे. बांबू उद्योग सकल राष्ट्रीय उत्पादनात खूप मोठे योगदान देत असून याद्वारे ५० हजार प्रत्यक्ष आणि १.५ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करत असल्याचे मत श्री.मुथा यांनी या सत्रात व्यक्त केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi