Wednesday, 16 July 2025

रुग्णसेवेसाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणारpl shate

 रुग्णसेवेसाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार

- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  मुंबई, दि. 15 : क्रमांक 108 आणि 102 या दोन्ही सेवा रुग्णांसाठी उपयुक्त असून, 108 सेवेबाबत अलीकडे काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या कोणतेही वाहन इंधनाअभावी थांबलेले नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

 महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्तावादरम्यान सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मे 2025 पर्यंतचे वेतन देण्यात आले असून जून आणि पुढील महिन्यांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

            राज्यातील रक्तसाठ्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, पावसाळा व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, मात्र उन्हाळ्यात यामध्ये दुर्लक्ष होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातही रक्तदान वाढावे यासाठी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी सभागृहामार्फत जनतेला केले. रक्ताच्या कमतरतेमुळे राज्यात कुठेही मृत्यू झाल्याची घटना नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धर्मादाय रुग्णालयांमधील नियमभंगाबाबत मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, मागील अधिवेशनात एक विधेयक सादर करण्यात आले असून, त्याद्वारे आमदारांची समिती सर्व धर्मादाय रुग्णालयांचे निरीक्षण करणार आहे. तसेच, नियमभंग झाल्यास कारवाईचे अधिकारही त्यात आहेत.

जळगावच्या चोपडा येथे गर्भवती महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेवर, मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, संबंधित कक्षाला कोणताही कॉल प्राप्त झाला नव्हता. तसेच, जळगाव जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकांच्या सेवा चांगल्या प्रकारे दिल्या गेल्या आहेत.

शीतसाखळी उपकरणांच्या खरेदीबाबतच्या आक्षेपावर, त्यांनी सांगितले की, आयएलआर व डीप फ्रिजर उपकरणांची खरेदी प्रशासकीय मंजुरीनंतर पारदर्शक व स्पर्धात्मक प्रक्रियेतून करण्यात आली. जुलै 2024 मध्ये 62 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली. निविदा प्रक्रियेमध्ये काही आक्षेप नोंदवले गेले, त्यावर सुधारणा करून नव्याने निविदा काढण्यात आल्या. हे दर जेईएम पोर्टलच्या दरांपेक्षाही 27 टक्के ते 42 टक्के कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही, राज्य शासनाकडून संपूर्ण पारदर्शकतेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही शंका पूर्णतः दूर झाल्याशिवाय देयके अदा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभाग अधिक गतिमान व पारदर्शक व्हावा, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असेही श्री.आबिटकर यांनी शेवटी 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi