Sunday, 1 June 2025

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

 कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  केंद्राच्या पाहणीनंतर  कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवप्रवर्तन केंद्राच्या कार्यपद्धती व पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे मिळणारे व्यावहारिक ज्ञान व कौशल्य, शेतकऱ्यांच्या अनुभवांद्वारे मिळालेला फायदा — उत्पादनवाढ, खर्चात बचत, आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रात सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान व नवकल्पनांनी कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रभावित झाले. त्यांनी अशा केंद्रांचा शेतीतील क्रांतीसाठी असलेला उपयोग आणि विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपक्रमांची माहिती घेऊन राज्यात त्याबाबत नक्कीच कार्यवाही करू  असेही सांगितले.

• स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि कृषी अवजारे: स्वयंचलित ट्रॅक्टर व त्यांच्यासोबत चालणाऱ्या अवजारांची कार्यक्षमता व श्रमबचतीसाठी असलेले महत्त्व.

• कृषी ड्रोन: ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षण, कीड ओळख, आणि अचूक फवारणीसाठी कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या उपक्रमाची माहिती घेतली.

• प्रेसिजन शेती तंत्रज्ञान: जी. पी. एस. आधारित प्रणाली व बदलत्या दराने खते व औषधे देण्याच्या प्रणालीसह अचूक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

• शेती उपकरण डिझाईन लॅब्स: स्थानिक गरजांसाठी उपयुक्त व नवोन्मेषक्षम शेती उपकरणे तयार करणाऱ्या लॅब्सची यावेळी माहिती  देण्यात आली.

 

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi