संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या
समुहशिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे आळंदी पालखी मार्गावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प आणि संतसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. या संतसृष्टीत विविध संतांच्या जीवनावर आधारित विविध भित्तीचित्रे आहेत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई व इतर वारकरी २० असे एकूण २५ शिल्प मिश्र धातुमध्ये बनविण्यात आली आहे. विविध संतांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित एकूण ४७ कांस्य धातुच्या शिल्पांचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. यासाठी ३० कोटी ६९ लाख रुपयांतून ही कामे उभारण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment