Wednesday, 18 June 2025

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील

 संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण

पुणेदि. १८ : आपली संस्कृतीसंतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षणप्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र टाळगावचिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणेआमदार महेश लांडगेअमित गोरखेपिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंहसंतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे,  चिंतन समितीसंतपीठ समितीचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संतपरंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरुप देण्याचे काम करण्यात आले असून येथे संपूर्ण संतसाहित्य ‘सीबीएससी’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृतमराठीहिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वादनाचे वाजविण्याचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे.

संतपीठाने  तयार केलेल्या यापुढील संकल्प आराखड्यानुसार  पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला शासन पूर्णपणे मदत करेल. सगळ्या ठिकाणची संतपीठे एकमेकांना पूरक बनविण्यात येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याचा मार्ग खुला झाला असून मराठीला वैश्विक भाषाज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालनही खुले झाले आहे. हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्वीकारले असून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे म्हणालेसंतपरंपरा जपणारी शाळा स्थापन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. संतांचे विचार या संतपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल. संतपीठ समितीच्या यापुढील संकल्पास  शासनाने आवश्यक ती मदत करावीअसे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली येथे  संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष संत सोनबा ठाकुर पखवाज कक्ष पंडीत अरविंद मुळगावकर तबला कक्ष तसेच आलीजाबहाद्दर ह.भ प महादजी शिंदे सभागृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत या वर्षात सुमारे १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

            पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित करण्याच्य महत्वाकांक्षी उद्देशाने टाळगाव चिखली येथे २३ कोटी ५४ लाख रुपये खर्चातून  'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठविकसित केले आहे. यामध्ये तळमजला तसेच ५ मजले असे इमारतीचे नियोजन करण्यात आले असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १३ हजार १६१ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये ५५ वर्गखोल्या९ कार्यालये४० इतर खोल्या ज्यामध्ये प्रयोगशाळासंगणक कक्षसभागृहसंगीत तथा वाद्य कक्ष आहेत. प्रत्येक मजल्यावर स्वछतागृहेविद्यार्थ्यांना खेळण्याकरिता विस्तीर्ण मैदान आदी सुविधा आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi