Monday, 16 June 2025

राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी केले महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

 राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी केले

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

 

मुंबईदि. 16 : विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी वरळी नाका शाळा संकुल मधील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

वरळी नाका शाळा संकुल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी राज्य प्रकल्प संचालक संजय यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळसमग्र शिक्षा अभियानाच्या सहायक संचालक श्रीमती सरोज जगतापजी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वर्षा गांगुर्डेसंकुलातील सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापकशिक्षकविद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. यादव यांनी शिक्षक विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi