Monday, 16 June 2025

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार महाराष्ट्र

 महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे

-         मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 16 : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्री  श्री.राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.

यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेकॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. शालश्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री श्री.राणे यांचा सत्कार करण्यात आला.

 सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री श्री.राणे म्हणाले कीविभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi