Wednesday, 18 June 2025

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

 

पुणेदि. १८ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरश्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी आमदार सुनील शेळकेश्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरेपालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरेह.भ.प वैभव महाराज मोरेह.भ.प दिलीप महाराज मोरेविश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरेह.भ.प.उमेश महाराज मोरेह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शनानंतर संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री.पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊलीमाऊलीचा गजरडोक्यावर तुळशी वृंदावनहाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi