Thursday, 12 June 2025

विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या समस्यांबाबत आढावा

 विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या समस्यांबाबत आढावा

         विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विधिमंडळ समिती कक्ष येथे आयोजित बैठकीत विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल, भांबोली येथील प्लास्टिक ओमनियम प्रा.लि., धानोरी येथील मे.राठी ट्रान्सपॉवर, पॉलीबाँड या खाजगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. यावेळी न्यायालयात दाखल प्रकरणांबाबत चर्चा झाली. न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले, कामगार संघटनेचे अर्जुन सुद्रिक यासह अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi