Thursday, 12 June 2025

पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे सादरीकरण

 पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे सादरीकरण

        पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांच्या नियोजन आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. मोशी येथे न्यायसंकुल इमारत (खालचा तळ मजला+तळ मजला +५ मजले) (२८ कोर्ट हॉल), नवीन शासकीय विश्रामगृह इमारत, मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय व प्रयोगशाळा इमारतीमधील आधारभित, संरक्षक भिंत, काँक्रिटीकरण तसेच प्रशिक्षण केंद्र उभारणी, चिखली येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी नवीन इमारत, रावेत येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट साठवणुकीकरीता गोदाम इमारतीचे बांधकाम या विकास कामांच्या नियोजन आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, कक्ष अधिकारी संदीप पाटील, कामगार उपायुक्त ल. य. भुजबळ यासह पोलीस, कामगार, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi