प्रारंभी सर्व साधू, महंतांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व साधू, महंतांचे शासनातर्फे स्वागत केले.
नाशिक कुंभमेळा
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026, दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी
(स्थळ-रामकुंड पंचवटी)
प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027,आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार 11 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध एकादशी
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026,
प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027, आषाढ सोमवती अमावस्या.
महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027, श्रावण अमावस्या
तृतीय अमृतस्नान-शनिवार 12 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).
याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा 2027 मध्ये मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण 44 मुहूर्त असून त्रंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण 53 मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
(
No comments:
Post a Comment