Tuesday, 24 June 2025

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे 

रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा

रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यासह 

पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 

          मुंबईदि. २३ :-  कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.  लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

          राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४,  रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमीठाणे जिल्ह्यात १४.३  आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

          राज्यात कालपासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १४.३रायगड १०.७रत्नागिरी २५.८,  सिंधुदुर्ग ३६.४पालघर ७३.३नाशिक ६.२धुळे ०.५नंदुरबार २.९जळगाव ०.९अहिल्यानगर ०.२पुणे ४.३सोलापूर ०.१,  सातारा ४.७,  सांगली २.८,  कोल्हापूर १३.९छत्रपती संभाजीनगर १जालना १.१धाराशिव ०.२नांदेड ०.३हिंगोली ०.४बुलढाणा १.१अकोला ३.४वाशिम ०.४ अमरावती ०.५यवतमाळ ०.६वर्धा ०.२नागपूर १.५भंडारा ०.६गोंदिया १.७चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

          ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

०००० 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi