Wednesday, 18 June 2025

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत; २१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण

 देशातील पहिला सृजनशीलसांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत;

२१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण

-          सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

 

मुंबई दि. १८ : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

             21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दु. 2.00 वाजता हा सोहळा आयोजित  करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

रेडिओ क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिकऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती रेडिओमार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात आकाशवाणीनेही भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहे. मराठी संगीतगाणीशास्त्रीय संगीत जपणारेउदयमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदकमराठी अभिनेतेसंगीतकारगीतकारलेखकतंत्रज्ञसंपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कलासाहित्यसंस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनराजकारणसामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले जात आहे. त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात  आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi