Wednesday, 18 June 2025

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

 आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

 

        मुंबईदि. १७ : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवारदि. ६ जुलै२०२५ रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणावारकरी पटकाश्रींची मूर्तीउपरणेचिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरेसंभाजी शिंदेह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकरॲड. माधवी निगडेअतुलशास्त्री भगरे गुरुजीह.भ.प. प्रकाश जवंजाळह.भ.प. शिवाजीराव मोरेकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची तसेच अन्य व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi