Wednesday, 18 June 2025

संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

 संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी

संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने तीर्थक्षेत्रास " अ " दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहणमंदिरभोवतालचे संरक्षक भिंत यांसह विविध विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून संबंधित प्रस्ताव पाठवण्यात यावे व आराखडयास अंतिम करण्यासाठी कामास गती द्यावी असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवलेमंदिर संस्थानचे प्रमुख सावता महाराज वसईकरप्रभू महाराज उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादकार्यकारी अभियंता अजय भोसलेवास्तुशास्त्र विशारद हेमंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi