Friday, 30 May 2025

जागतिक तंबाखू विरोधी’ दिनानिमित्त 'दिलखुलास' कार्यक्रमात आरोग्यविषयक जागृती

 जागतिक तंबाखू विरोधी’ दिनानिमित्त

'दिलखुलासकार्यक्रमात आरोग्यविषयक जागृती

      

मुंबईदि. 30 : 'जागतिक तंबाखू विरोधी दिनाचेऔचित्य साधूनमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासया कार्यक्रमात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देणारी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. जी. टी. रुग्णालयमुंबई येथील दंत वैद्यक विभागाच्या प्रमुख आणि सहायक प्रा. डॉ. रेशम पाखमोडे यांच्या मार्गदर्शनातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

 

ही विशेष मुलाखत शनिवार, 31 मे 2025 तसेच सोमवार, 2 जून आणि मंगळवार, 3 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. सहायक संचालक जयश्री कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. यामागील उद्देश तंबाखूच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव जनतेला करून देणे हा आहे. तंबाखूचा वापर अनेक घातक आजारांना आमंत्रण देतो. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत राज्यात सातत्याने विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे होणारे गंभीर आजारत्यापासून बचावाचे उपायआणि आरोग्यविषयक काळजी याबाबत दिलखुलासकार्यक्रमातून डॉ. पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi