Wednesday, 28 May 2025

श्री लक्ष्मीनारायण मंदिर शिक्षण, समाजसेवा, संस्कार, सांस्कृतिक उन्नतीचे केंद्र

 श्री लक्ष्मीनारायण मंदिर शिक्षणसमाजसेवासंस्कारसांस्कृतिक उन्नतीचे केंद्र





- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लक्ष्मीनारायण मंदिर समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित करत आलेले श्रद्धास्थान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. २७ :- श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसूनशिक्षण,समाजसेवासंस्कार आणि सांस्कृतिक उन्नतीचे केंद्र आहे. हे ठिकाण भविष्यात मध्यमवर्गीयांसाठी आरोग्यसेवासांस्कृतिक शिक्षणमातृभाषा संवर्धन यासाठी एक समर्पित केंद्र बनू शकतेअसे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. लक्ष्मीनारायण मंदिर हे गेल्या दीडशे वर्षांपासून समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित करत आलेले श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा वर्धापन दिन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढायांच्यासह विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, सन १८७५ मध्ये विदेशी सत्तेच्या काळात मंदिराच्या माध्यमातून सामाजिक चेतना निर्माण करणारे कार्य महान विभूतींनी केले. या मंदिराचे आणि माधवबाग ट्रस्टचे समाजासाठीचे योगदान कौतुकास्पद आहे. लक्ष्मीनारायण मंदिरचे ट्रस्टच्या शुचितासंतुलन आणि सत्कर्म’ या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी केले. २०० व्या वर्षपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना हे केंद्र केवळ धार्मिक नव्हेतर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनानेही समृद्ध व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा गौरव करत केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा म्हणालेया काळात भारताने ऐतिहासिक प्रगती केली आहे. राम मंदिर उभारणीकाशी विश्वनाथ कॉरिडॉरयोगाचा जागतिक प्रचारऑपरेशन सिंदूर या सारख्या कृतींमुळे भारताचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य झाले असल्याचे श्री. शाह यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi