Saturday, 3 May 2025

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी मेगा ब्लॉक नाही

 नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर

4 मे रोजी मेगा ब्लॉक नाही

 

मुंबई, दि. 2 : राष्ट्रीय परिक्षा एजेंसीनवी दिल्ली यांचेमार्फत रविवारी दि. 4 मे 2025 रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) - 2025 ही परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रावर विना अडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासनमुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार दि. 4 मे 2025 रोजी कोणताही Mega Block ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगानेरेल्वे प्रशासनाने दि. 4 मे 2025 रोजी सेंट्रलहार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही Mega Block नसल्याचे कळविलेले आहे. तरी यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi