Saturday, 3 May 2025

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ : प्रवेशपत्र उपलब्ध

 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ : प्रवेशपत्र उपलब्ध

 

 मुंबईदि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध झाली आहेत. संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरून आपल्या खात्यात लॉगइन करून डाउनलोड करावीत.

 

ही परीक्षा १०१११३१४ आणि १५ मे २०२५ या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मूळ स्वरूपात छापील प्रवेशपत्र अनिवार्य असून त्याविना परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाहीअशी स्पष्ट सूचना आयोगाने केली आहे.

परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या वाहतूक कोंडीआंदोलनेहवामानातील बदल इत्यादी कारणांमुळे उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एका तास आधी स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नियोजित वेळेनंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

अधिक माहितीसामान्य सूचना आणि मार्गदर्शक नियम आयोगाच्या संकेतस्थळावर ‘Guidelines for Examination’ या विभागात उपलब्ध आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास उमेदवारांवर कारवाई होऊ शकते.

प्रवेशपत्र मिळवताना अडचण आल्यास उमेदवारांनी आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in किंवा support-online@mpsc.gov.in या ईमेलवर किंवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi