Tuesday, 15 April 2025

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

 युवा पिढीने योगाचा अंगीकार करून

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट

 

मुंबईदि. 9 : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'अंतर योग फाउंडेशनला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

मंत्री पाटील म्हणालेया संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनामहिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असूनअशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi