Tuesday, 29 April 2025

श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा,जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे

 श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा

श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि  सिंहगड किल्ला समर्ग संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन नवीन विकासकामे करण्यात यावी. हे करताना मंदिर आणि किल्ला परिसराचे ऐतिहासिक, प्राचीन सौंदर्य कायम राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी दिल्या.

जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे

किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी अतुलनीय शौर्य, साहस आणि निष्ठेचे दर्शन घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, जिवाजी महाले यांच्या प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi