Tuesday, 25 February 2025

नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती विशेष दुरुस्ती योजनेतून करा

 नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती

विशेष दुरुस्ती योजनेतून करा

- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 

मुंबई, दि. 25 : नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती कामे विशेष दुरुस्ती योजनेतून करावीत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे कॅनॉल दुरुस्ती व गोसीखुर्द प्रकल्पाचे  प्रलंबित संदर्भात जलसंपदा  मंत्री श्री. महाजन यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली.  बैठकीस माजी आमदार शोभाताई फडणवीस, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजय टाटू, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, अधीक्षक अभियंता राजेश पाटील व प्रवीण झाडे आदी  अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती कामांबाबत लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. कॅनॉल दुरुस्तीची कामे गतीने व दर्जेदार करावीत. ही कामे विहित कालावधीत पूर्ण  करण्यासाठी या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. याबरोबरच मूल तलाव फिडर संपूर्ण कॅनॉल दुरुस्ती बिगर सिंचन निधीतून करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi