Sunday, 29 September 2024

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार 'हर घर दुर्गा' अभियानाचा शुभारंभ

  

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार

'हर घर दुर्गाअभियानाचा शुभारंभ

 - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई दि. 28: दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असूनवाईट प्रवृत्तींचा नाश करते. त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे.

या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींव्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतातअसे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या अभियानामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार आहे. इतर विषयांप्रमाणे आत्म संरक्षणाच्या सुद्धा तासिका असाव्यात अशी मंत्री श्री. लोढा यांची संकल्पना होती, त्यानुसार 'हर घर दुर्गा अभियानराबविण्यात येत आहे.

नवरात्र उत्सवात स्वसंरक्षण शिबिराचा एक कार्यक्रम ठेवावा, असे सांगून सर्व मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानाला साथ द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

राज्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले असूनत्याचे देखील उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi