Tuesday, 20 August 2024

मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे

 मंकीपॉक्सला घाबरू नकासतर्क रहावे

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

            मुंबईदि. २० जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.  त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

            मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार  केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध  व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळेबंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणेचाचणी प्रयोगशाळा तयार करणेतपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणेमंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षणप्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे

- आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

            मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न  जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावाअसे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.

            मंकीपॉक्स या आजाराविषयी काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आरोग्य उपसंचालकआरोग्य अधिकारीमहापालिकांचे आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सक यांनाही आयुक्त श्री. नायक यांनी निर्देश दिले आहेत.

*मंकीपॉक्स म्हणजे काय?*

            मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यतबाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे कीथेट शारीरिक संपर्कशरीर द्रवलैंगिक संपर्क किंवा जखमघाव यातील स्रावबाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडयांमार्फतजर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणेप्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

*संशयित रुग्णाची लक्षणे –*

•          मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे

•          सुजलेल्या लसिका ग्रंथी

•          ताप

•          डोकेदुखी

•          अंगदुखी

•          प्रचंड थकवा

•          घसा खवखवणे आणि खोकला

*मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-*

•          संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.

•          रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.

•          हातांची स्वच्छता ठेवणे.

•          आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.

• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi