Tuesday, 20 August 2024

बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित करणार -

 बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित  करणार

- मुख्यमंत्री  पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल

 

            मुंबई,दि.२०: बांबू लागवडीसाठी  खड्डे खोदणे व बांबू  कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे  कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कृषी मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सच्या बैठक झाली.

      डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रायव्हेट लिमिटेडचे वेंकट राव,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

        अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले कीराज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रीक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात  फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो.मात्र या इलेक्ट्रीक टूल बार या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. तसेच या यंत्रासोबत बांबू  कापण्यासाठी मनुष्यबळ  देखील आवश्यकता आहे हे लक्षात घेवून यामध्ये डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत  अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठी  देखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात हे काम करता येणे शक्य होणार आहे, अशा सूचनाही श्री.पटेल यांनी यावेळी केल्या.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi