Thursday, 25 July 2024

अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनाला घराबाहेर पडू नका, स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या..

 अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनाला

घराबाहेर पडू नकास्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या..

-उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबईदि.25 : राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नदीनालेओढे. धरणपूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगरटेकड्यादऱ्याधबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणेनिसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यंस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवणपूरग्रस्तसखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनाआवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. 

००००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi