Tuesday, 7 May 2024

‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

 ‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची

‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

            मुंबई, दि. ६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी  जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४  रोजी  आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            जळगाव जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा  निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi