Tuesday, 7 May 2024

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात

 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात

 

            मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली आहे.

            आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नावपक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अयुब अमीन हुनगुंद (बहुजन समाज पार्टीहत्ती)ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टीकमळ)गायकवाड वर्षा एकनाथ (इंडियन नॅशनल काँग्रेसहात)ॲन्सन थॉमस (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरद्राक्षे)कुर्बान शहादत हुसेन (राष्ट्रीय ओलमा कौन्सिलबॅट)खान अब्बास अहमद (बहुजन महा पार्टीशिट्टी)डॉ. (ॲड.) यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडीकोट)रमजान अली चौधरी (ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीनपंतग)शौकत अब्दुल रफीक खान (इन्सानियत पार्टीऑटो रिक्षा)संतोष गणपत अंबुलगे (वंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर)हयात्तुल्लाह अब्दुल्लाह शेख (अखिल भारतीय मुस्लिम लीग सेक्युलरबॅटरी टॉर्च)हर्षदा बाबूराव जाधव (महाराष्ट्र विकास आघाडीरोड रोलर)अब्दुल ताहीर ॲडव्होकेट (बबलू रजनीकांतअपक्षकाडेपेटी)ॲड. असिफ अली सिद्दीकी (अपक्षजहाज)ॲड. उत्तमकुमार नकुल सजनी साहू (अपक्षबासरी)इजाज मोहम्मद सफी खान (अपक्षडंबेल्स)डॉ. गफ्फार इब्राहिम सय्यद (अपक्षस्टेथोस्कोप)नजमाखतून मोहम्मद जफर खान (अपक्षकॅमेरा)नरेंद्र मिश्रा (अपक्षसफरचंद)ॲड. फिरोज शेख (अपक्षस्पॅनर)मुझाफर अली शेख (अपक्षचालण्याची काठी)मुश्ताक हैदर शेख (अपक्षहिरा)युनूसअली रशीद मुल्ला (अपक्षदूरध्वनी)रमा अरुण साबळे (अपक्षनागरिक)राजेश मोहन लोखंडे (अपक्षखाट)शांताराम स. दिघे (अपक्षप्रेशर कुकर)संदीप (भाऊ) रामचंद्र जाधव (अपक्षपेनाची निबसात किरणांसह).

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi