Tuesday, 7 May 2024

लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

 लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठ

राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

            मुंबईदि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.

               लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षउमेदवारांनी पालन करावयाच्या नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी श्री. पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

               या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवसर्वसाधारण निरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शीनिवडणूक पोलीस निरीक्षक मुकेश सिंहअपर पोलीस आयुक्त अनिल पारसकरसहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरातसमन्वय अधिकारी तुषार मठकरउपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मतदारांनी उन्हापासून योग्य ती काळजी घ्यावी. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून प्रथमोपचार पेटीवेटिंग रूम व इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

               निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देऊन श्री. पानसरे म्हणालेमुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत आहे. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. प्रचारविषयक नियमनिवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

            याप्रसंगी ११ नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना व अन्य १५ उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन श्री. पानसरे यांनी यावेळी केले. ईव्हीएमबाबतच्या शंका, रॅन्डमायझेशन कसे होतेयाबाबतचे प्रात्यक्षिक निरीक्षकांसमोर उमेदवारांच्या प्रतिनिधींना ८ मे रोजी दाखविले जाणार असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले

            निवडणूक काळात सोशल मीडिया वापरताना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य ती काळजी घ्यावीडिपफेक व्हिडिओ करणे हा गुन्हा आहे. रॅली काढताना वाहतुकीला अडथळा होईलअशी कृती करता कामा नयेस्पीकरची परवानगी पोलिसांकडून घ्यावी, ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजांवर बंदी असल्याचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi