Tuesday, 7 May 2024

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन पारंपरिक पद्धतीने स्वागत मतदान साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्राँग रूमला भेट

 निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे

अलिबाग येथे झाले आगमन पारंपरिक पद्धतीने स्वागत

मतदान  साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्राँग रूमला भेट

 

 

रायगड दि. 6 :- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आयइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधींचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरीता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटपवाहतूक आणि स्ट्राँग रूममतमोजणी कक्षाची पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षणफेटा आणि हार घालून स्वागत केले. या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांग्लादेशचे दोन प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी,जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दिरोवआयबक झीकन (केंद्रीय निवडणूक आयोग कझाकिस्तान)श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना (संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे आहेत.

या प्रतिनिधींनी जे.एस.एम. महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाची साहित्य वाटपाची तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.  याबरोबरच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.ज्योस्ना पडियार यांनी ईव्हीएमव्हीव्हीपॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविली. या मंडळाने नेहुली येथील स्ट्राँगरूमची पाहणी केली. मतदानानंतर स्ट्राँगरूम मध्ये जमा करण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची विधानसभा मतदार संघनिहाय रचना केली जाते त्याची पाहणी करुन त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच मतमोजणी कशा पद्धतीने होतेमतमोजणी केंद्राची रचनाआवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi