Friday, 12 April 2024

दिलखुलास' कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

 ‘दिलखुलास' कार्यक्रमात

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

 

            मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'लोकसभा निवडणूक २०२४' या विषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवार दि.१३ एप्रिल आणि सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            आदर्श आचारसंहिता, निवडणुकीचे कामकाज सुरळित करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली सर्व कार्यवाही, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था   कार्यवाही, मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती श्री.स्वामी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून  दिली आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi