Thursday, 14 March 2024

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबईदि. 14 : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा प्रति कुलपती हसन मुश्रीफ यांनी केल्या.

            नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सन 2024 मधील अधिसभेच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे ते बोलत होते.

            यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकरप्र.कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांच्यासह सर्व अधिसभा सदस्य उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, संशोधन आणि आरोग्य शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. या दृष्ट‍िकोनातून विद्यापीठाने "सेंटर ऑफ एक्सलन्स" हा नवीन विभाग सुरु केला असून नुकतेच त्याचे उ‌द्घाटन झाले आहे. तसेच विविध परदेशी विद्यापीठ व संस्थासमवेत सामंजस्य करार केले असून ऑस्ट्रेलियन विद्यापीठासमवेत विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्याकरिता विद्यापीठाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत "अॅकॅडमिक डायलॉग" हा दोन दिवसीय कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केला. यामुळे विद्यापीठ शिक्षण व आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर वेगळी ओळख निर्माण करेल.

            विद्यापीठाकडून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामनॅक मानांकनाकरीता नॅक्सेलचा प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच विहित वेळेत निकल जाहीर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून अत्यंत कमी वेळात निकाल घोषित करण्यात येतो, याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

            अध्यापनसंशोधनविस्तारसेवा याद्वारे ज्ञान व बुध्दिमत्ता यांचा प्रसार निर्मिती व जपणूक करणे व समाज जीवनावर परिणामकारक प्रभाव पाडणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन आरोग्य सेवा देणारा विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य विद्यापीठाचा लौकिक आणखी वाढविण्यासाठी अधिसभेने उर्वरीत ४ वर्षामध्ये योग्य ती वाटचाल करावी. विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये अधिसभा ही मोलाची भूमिका बजावत असते. विद्यापीठाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी अधिसभेची असते. त्यामुळे विद्यापीठास मार्गदर्शन करण्याचे काम ही अधिसभा करेल, असे त्यांनी सांगितले.

            कुलपती कार्यालयाने यावर्षीचा "आविष्कार २०२३-२४" हा राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन प्रकल्प महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविली व त्यांनी ती समर्थपणे व उत्कृष्टरीत्या पार पाडली याकरीता विद्यापीठाचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi