Thursday, 14 March 2024

पदरवाडी गावच्या पुनर्वसनसाठी तत्वतः मान्यता

 पदरवाडी गावच्या पुनर्वसनसाठी तत्वतः मान्यता 

- मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. 14 :- खेड तालुक्यातील पदरवाडी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात येत असून या गावच्या पुनर्वसनासाठी   जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही  करावीअसे निर्देश मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

            पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पदरवाडी गावचे पुनर्वसन करणेबाबत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात बैठक झाली. आमदार दिलीप मोहितेपुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदेनिवासी उपजिल्हाधिकारी पुणे ज्योती कदमउपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तहसिलदार प्रशांत बेडसे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारेसहसचिव सत्यनारायण बजाजअपर तहसीलदार स्नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले कीपदरवाडी गावाच्या कायम स्वरुपी पुनर्वसनास भूसंपादन व अन्य बाबींसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या गावाचे पुनर्वसन होईपर्यंत पावसाळा व आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतरासह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यातअशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi