Sunday, 18 February 2024

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

 पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि.18: पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-2024 बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेटाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.

            पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे, यानिमित्ताने त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi