Thursday, 22 February 2024

निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

  निविष्ठा सुधारणा विधेयक

सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 21 : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            अप्रमाणितभेसळयुक्त व बनावट बियाणेकीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.

            या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरीडॉ. मनीषा कायंदेसमीर कुणावरसंजय रायमुलकर, कैलास पाटीलबाबासाहेब पाटीलदिलीप बनकर, प्रकाश आबिटकरकृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडामविधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.

            या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजेत्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

            बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तूबियाणेकीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi