Thursday, 22 February 2024

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्रय रेषेखालील  गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

        महामंडळामार्फत मांगमातंगमिनी- मादिंगमादिंग,दानखणी मांगमांग महाशीमदारीराधेमांगमांग गारुडी,मांग गोराडीमादगी व मादिगा या समाजातील गरजू लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मुंबई व राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या मार्फत विविध व्यवसायाकरिता सुविधा कर्ज योजना, कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख रुपयेमहिला समृद्धी योजना कर्जमर्यादा रक्कम १.४० लाखशैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी रक्कम ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम ४० लाख या प्रमाणे योजना सुरु करण्यात आली असून त्यानुसार जिल्हा कार्यालयात उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

               अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणीचा विचार करून महामंडळामार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://betasladc.org ह्या संकेतस्थळावर करावेत. या कर्ज योजनांचे लाभ घेण्यासाठी अर्ज दि.२० फेब्रुवारी २०२४ ते दि.२० मार्च २०२४ या कालावधीत ऑन लाइन पध्दतीने करावेत.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi