Tuesday, 9 November 2021

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


          🌻 *आनंदी पहाट* 🌻


            *इंद्रायणी काठावरची*


                *पु. ल. देशपांडे*

              *जन्म दिन विशेष*

                    

🌹🔆🌸🌿🚩🌿🌸🔆🌹 

        

        *पु. ल. यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले तरीही महाराष्ट्राने दिलेली पदवी म्हणजे 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार हे आजन्म जवळचे वाटणारे.* 

        *पु. ल. बहुआयामी. त्यांनी अनेक कलांत नैपुण्य प्राप्त केले. अनेक क्षेत्र गाजवली. याचे कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता. लहानपणी त्यांना एका जागेवर शांत बसविणे ही घरच्यांची कसरत होती. अगदी वयाच्या पाचव्या वर्षी आजोबांनी लिहून दिलेले भाषण साभिनय सादर केले, तर बाराव्या वर्षी स्वतःच भाषण लिहून सादर करायचेच पण इतरांनाही लिहून द्यायचे. घरच्या गाण्याच्या मैफिली ऐकून अनेक वाद्य पण शिकले. त्यांचे पेटीवादन ऐकून बालगंधर्वही सुखावले होते.*

        *१९४७ मध्ये त्यांचा चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून प्रवेश झाला. चित्रपट क्षेत्रातील सर्वच अंग आत्मसात केली. अभिनयासह कथा.. पटकथा.. संवाद लेखन.. दिग्दर्शन.. संगीत यामध्येही पु. ल. आपली छाप पाडायचे. त्यांनी आकाशवाणी.. दुरदर्शन यामध्ये ही काही काळ नोकरी केली. देशात दुरदर्शनचा प्रारंभ होताच पं. नेहरुंची पहिली मुलाखत पु. लं. नी घेतली होती.*

        *'गुळाचा गणपती' हा साध्या भोळ्या व्यक्तीला लोकांच्या डावपेचाचा होणाऱ्या त्रासावरचा चित्रपट. या चित्रपटात तर पु. लं. प्रमुख अभिनेते होतेच पण कथा.. पटकथा.. संवाद.. दिग्दर्शन आणि संगीतही त्यांचेच असल्याने सबकुछ पु. ल. म्हणून प्रसिद्ध आहे.*

        *इंद्रायणी काठावरची आळंदी. जिथे सत्ता आहे ती जगाला सत्य ज्ञान मुक्तपणे वाटणाऱ्या ज्ञानियाच्या राजाची. या संजीवन समाधीच्या मागे पुढे सारे जग ज्ञानप्राप्तीसाठी धावतेय. इथे मनातील अंधःकार दूर करणारा उजेड आहे. इथेच मनात.. बुद्धीत दडलेला अहंकार दूर करणारे कैवल्याचे.. मोक्षाचे झाड आहे. याच ज्ञानोबा नामक वटवृक्षाखाली ज्ञान प्राप्त होत निवृत्ती.. सोपान.. मुक्ताबाईंंचे जीवन उजळले. ज्ञानप्रकाशाने मोक्षाचा मार्ग सापडला.*

        *इंद्रायणी नदी. जिच्या  तिरावर ज्ञानोबांनी प्रदान केलेल्या सत्यमार्म ज्ञानाने मनुष्याच्या अनाठायी इंद्रिये इच्छा वाहून जातात.. इंद्रिय विजय प्राप्त होतो.. समता बुद्धी प्राप्त होत मनःशांती लाभत जीव शिव होतो.,अर्थात मोक्ष लाभतो अशी ही सरीता.*

        *पु. ल. यांच्या संगीताची जादू अशी की, आजही या चित्रपटाची गाणी लोकप्रिय आहेत. भीमसेन जोशींना त्यांची मैफिल ज्या गाण्याशिवाय लोक पूर्ण होवू देत नव्हते अश्या या गाण्याचे संगीतकारही पु. ल. आणि चित्रपटात हे गाणे साभिनय सादर केलंय पु. ल. यांनीच.*

     

🌹⚜️🌹🔆🚩🔆🌹⚜️🌹

 

  *_इंद्रायणी काठी, देवाची आळंदी_*

  *_लागली समाधी, ज्ञानेशाची_*


  *_ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव_*

  *_नाचती वैष्णव, मागेपुढे_*


  *_मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड_*

  *_अंगणात झाड कैवल्याचे_*


  *_उजेडी राहिले उजेड होऊन_*

  *_निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई_*


🌸☘🌺🥀🌻🥀🌺☘🌸


  *गीत : ग. दि. माडगूळकर*  ✍

  *संगीत : पु. ल. देशपांडे*

  *स्वर : पं. भीमसेन जोशी*

  *चित्रपट : गुळाचा गणपति (१९५३)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *०९.११.२०२१*


🌻🌸🥀⭐🌺⭐🥀🌸🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi