Tuesday, 9 November 2021

 पेट्रोल पंपढाबेहॉटेल्सला पोचमार्गासाठी परवानगीच्या प्रक्रियेमध्ये येणार सुसूत्रता

राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी

परवानगीची नवी कार्यपद्धती लागू

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

 

            मुंबईदि. 9 : राज्य मार्गप्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशनरिसॉर्टसहॉटेल्सढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना  पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यामधील अडचणी दूर झाल्या असून परवानगीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली आहेपरिणामी शासनाच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेसया संकल्पनेस चालना मिळाली आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

            सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कडेला पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन्सरिसॉर्टसहॉटेल्सढाबे यांना राष्ट्रीय महामार्गराज्यमार्ग,  प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्गाची निकड भासतेत्या पोचमार्गासाठी परवानगी प्रस्तावांची छाननी इंडियन रोड काँग्रेस व केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2003 च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार केली जात होती.

            केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दि. 26 जून 2020 च्या परिपत्रकान्वये पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशनरिसॉर्टहॉटेलढाबे यांना राष्ट्रीय महामार्गांवरुन पोचमार्ग बांधण्याकरीता नव्याने सूचना जारी केल्या आहेत. या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.4 सप्टेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू केल्या होत्यामात्रया सूचना या केवळ राष्ट्रीय महामार्गांकरीता असल्यामुळे त्या राज्यमार्गप्रमुख जिल्हा मार्ग यांना लागू करताना अडचणी येत होत्या व त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर पोचमार्ग परवानगीच्या प्रस्तावांची पडताळणी करणे जिकिरीचे ठरत होते.

            याबाबत ऑईल कंपन्यालोकप्रतिनिधी  आदींकडून शासनाकडे तक्रारी आल्या होत्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या निकषांमध्ये राज्यातील रस्त्यांच्या दृष्टीने रस्त्यांच्या दर्जानुरूप सुधारणा करण्यासाठी सा. बां. प्रादेशिक विभाग पुण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली.

            या समितीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाइंडियन रोड काँग्रेसची मानकेमध्य प्रदेशपंजाबउत्तर प्रदेशबिहार व हरियाणा या राज्यांनी तयार केलेले निकषविविध न्याय निर्णयऑईल कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सूचना यांचा रस्ते सुरक्षा व सुरळीत वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने तुलनात्मक व सखोल अभ्यास करुन पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन व रिसॉर्टहॉटेलढाबे यांसारख्या खासगी आस्थापनांना राज्यमार्गप्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याकरिताची सुधारित मार्गदर्शक तत्वे दि. 9 जून 2021 रोजी शासनास अहवालाव्दारे सादर केली.

            समितीच्या अहवालानंतर राज्यातील राज्यमार्गप्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मागांवरुन पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी अवलंबिण्यात येणारी प्रचलित कार्यपध्दती बदलून राज्य शासनाने 13 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू केली आहे. या कार्यपद्धतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना राज्यजिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यात सुसूत्रता येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi