Monday, 26 July 2021

 महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

          मुंबई, दि. 26 :- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदारपक्षात विविध पदे भूषविलेलेआमचे सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेलारायगड जिल्ह्याचाकोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहलसुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभोही प्रार्थना.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi